
सौर दिनदर्शिका :
भारताचे पहिले पंतप्रधान स्व.पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पुढाकाराने मान्यवर शास्त्रज्ञ डॉ. मेघनाद सहा यांच्या अध्यक्षतेखालील कालगणना पुनर्रचना समितीने इ.स.१९५६ पासून सौर कालगणना बनविली आणि इ.स.१९५७ पासून सार्वजनिकरित्या प्रसारात आणली. भारतीय रिजर्व बँकेनेही या कालगणनेस मान्यता दिली असून यावर आधारित दिनांकित धनादेश वैध मानले आहेत. आणि म्हणूनच आकाशवाणी, दूरदर्शन, शासकीय पत्रव्यवहार आदी ठिकाणी या कालगणनेचा जाणीवपूर्वक उल्लेख केला जातो.
ग्रेगोरियन कालगणनेप्रमाणे वर्षारंभ १ जानेवारीला येतो पण त्या दिवशी अवकाशात कोणतीही विशेष घटना घडत नसते. आपल्या सौरवर्षाप्रमाणे नववर्षदिन १ सौर चैत्र (२२ मार्च, २१ मार्च लीपवर्षासाठी) असतो. या दिवशी सूर्य विषुववृत्तावर असल्यामुळे दिवसमान व रात्रमान समसमान असते म्हणून या विषुवदिनास शास्त्रीय महत्व आहे.
सौजन्यः ज्ञानप्रबोधिनी संत्रिका विभाग, पुणे, तसेच मराठी विज्ञान परिषद, ठाणे.
|
Requirements for Running Indian Solar Calendar :-
MicroSoft .NET Framework 2.0 Download भारतीय सौर दिनदर्शिका
|
Note:- Your comments and suggestions are welcome !
|
CopyRight © श्री Software Services, Saswad. |
2004 - 2009 |